कोल्हापूर : शिरोळ येथील शाळेत ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम उत्साहात | पुढारी

कोल्हापूर : शिरोळ येथील शाळेत 'जागर स्वावलंबी शिक्षणाचा' उपक्रम उत्साहात

शिरोळ: पुढारी वृत्तसेवा : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दत्तनगर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘दैनिक पुढारीच्या जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ या उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सत्यजित संदीप भंडारे याने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेत क्रांती चौकात सकाळी ७ वाजता सायकलवरून घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप केले आणि स्वावलंबी शिक्षणाचा संदेश दिला.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक कामत यांच्या हस्ते आणि येथील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते दैनिक पुढारीच्या अंकांचे वाचन करण्यात आले. तसेच वृत्तपत्र विक्रेते चिदानंद कांबळे व सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, शाळेतील मुलांनी डॉ.कलाम यांच्या जीवनावर नाटक सादर केले. गटशिक्षणाधिकारी कामत यांनी आपल्या मनोगतात विध्यार्थ्यांना श्रमाचे महत्व आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, वृत्तपत्र विक्रेते यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button