ठाकरे गट प्रतिज्ञापत्र पडताळणी प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पथक दाखल | पुढारी

ठाकरे गट प्रतिज्ञापत्र पडताळणी प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पथक दाखल

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: शिरोळ तालुक्यातून ठाकरे गट समर्थनात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील काही प्रतिज्ञापत्रांना आक्षेप असल्याची तक्रार मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल होती. याचा तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे पथक आज शुक्रवारी सकाळी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. याअंतर्गत 350 हुन अधिक शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राची पडताळणी सुरू झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक सावंत यांच्यासह 3 पोलीस अधिकाऱ्यांचे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील सहआदी शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

पोलीस अधिकारी दीपक सावंत यांच्यासह कुरुंदवाड पोलीस ठाण्यात प्रतिज्ञापत्रांची खातरजमा करण्यासाठी दोन अधिकारी, चौघांच्या पथकाने पडताळणी सुरू केली आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना नावावर व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यासाठी जिल्ह्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्याने प्रतिज्ञा पत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातून जवळपास बाराशे ते तेराशे प्रतिज्ञापत्र सादर झाल्याचे समजते. क्रूजर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अडीचशेहून अधिक प्रतिज्ञा पत्राची पडताळणी होणार आहे.

एकही प्रतिज्ञापत्र बोगस नसून, पोलिसांना सहकार्य करणार

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व पक्ष आणि चिन्ह बाबत सादर केलेले पत्र हे शिवसैनिकांनी आपल्या मर्जीने सादर केले आहेत. काही शिवसैनिकांनी रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरे साहेबांना पाठवत पाठिंबा दिला आहे. पोलीस प्रशासन आपले काम करत आहे. त्यांना शिवसैनिक सहकार्य करणारच यामध्ये एकही प्रतिज्ञापत्र बोगस नसल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला.

Back to top button