शिवाजी विद्यापीठाला लवकरच 35 कोटींचा निधी : अजित पवार

शिवाजी विद्यापीठाला लवकरच 35 कोटींचा निधी : अजित पवार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रही मागणीनंतर शिवाजी विद्यापीठाला लवकरच 35 कोटींचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील बैठकीत दिली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने येत्या अर्थसंकल्पात हा निधी समाविष्ट करण्याबाबत वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या.

2014-15 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांकरिता उपमुख्यमंत्री पवार यांनी 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार निधी मंजूरही करण्यात आला. परंतु, कोरोना तसेच अन्य कारणांमुळे निधी मिळण्यास विलंब झाला. मंजूर 50 कोटींमधील 16 कोटी 10 लाख रुपये आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. उर्वरित निधी लवकर मिळावा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी केली होती. याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने तसेच अधिसभेचे माजी सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

'या' उपक्रमांना मिळणार निधी

मिळणार्‍या निधीमधून स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसह मुलांचे वसतिगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन ही कामे होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news