मुंबई क्राईम ब्रँच पथक कोल्हापुरात, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी | पुढारी

मुंबई क्राईम ब्रँच पथक कोल्हापुरात, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक आज (बुधवार) सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. ठाकरे गट समर्थनात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील काही प्रतिज्ञापंत्रांना आक्षेप असल्याची तक्रार मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेत. याची खातरजमा करण्यासाठी दोन अधिकारी, दोन कर्मचारी असे चौघांचे पथक आज कोल्‍हापुरात दाखल झाले आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना नावावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यासाठी जिल्ह्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र (अपेडेव्हीट) सादर करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्याने मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक कोल्हापुरात आले असून, याची माहिती घेत आहेत. पोलीस मुख्यालयात या पथकाने माहिती घेतली.

ठाकरे गटाकडून सादर प्रतिज्ञापत्रांना आक्षेप घेण्यात आला असून, राज्यात 4 ठिकाणी तपासणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक सावंत यांनी सांगितले.

कोल्हापूर, पालघर, नाशिक, अहमदनगर येथेही पथके तपास करीत असल्‍याची माहिती समाेर येत आहे.

हेही वाचा :  

Back to top button