चकोते ग्रुप प्रायोजित पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा घ्या मनमुराद आनंद | पुढारी

चकोते ग्रुप प्रायोजित पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा घ्या मनमुराद आनंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : झणझणीत, लज्जतदार, चमचमीत, अस्सल कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घेत मनसोक्त शॉपिंग करण्याची संधी शहरवासीयांना चकोते ग्रुप प्रायोजित ‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे आयोजन दिनांक 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराज मैदान (बहिरवाडे मैदान) येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी हे सहप्रायोजक असून, स्मिता हॉलिडेज हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. शहरवासीयांना एकाच छताखाली 5 दिवस दिवाळी खरेदी करता येईल तसेच ओरिजिनल कोल्हापुरी खाद्यपदार्थांचा आस्वादही खवय्यांना घेता येईल आणि याबरोबरच दररोज धम्माल मनोरंजन कार्यक्रमही होणार आहेत. एकाच ठिकाणी आपल्या विविध प्रॉडक्ट विक्रीसाठीचीही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रदर्शनामध्ये : इलेक्ट्रॉनिक उत्पादने, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स खरेदीचे स्टॉल्स् तसेच खवय्यांसाठी मसाले, लोणची, चटण्या असे स्टॉल्स उपलब्ध असतील.

खाद्यपदार्थांची मेजवानी

फेस्टिव्हलमध्ये खवय्यांसाठी कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, चिकन 65, तंदूर, रोल्स, कोल्हापुरी मिसळ, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, चौपाटी पदार्थ, पिझ्झा, बर्गर, सँडविच, फ्रुट्स ज्यूस, आईस्क्रीम अशा अनेक पदार्थांचा आस्वादही या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना घेता येईल. खरेदीसाठी आणि खाद्यप्रेमींसाठी हे फेस्टिव्हल पर्वणी ठरणार आहे. गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था या प्रदर्शनात करण्यात आली आहे.

तारीख : दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2022
वेळ : सकाळी 10 ते रात्री 9

स्थळ : राजर्षी शाहू महाराज ग्राऊंड, महाबली मंदिररोड, साईनिकेतन हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड, पिंपरी-चिंचवड.

त्वरा करा! हजारो व्यक्तींपर्यंत पोहोचणारे एकमेव प्रदर्शनात आजच आपला स्टॉल बुक करा…
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – सनी : 9922930180, प्रणव : 9404077990

Back to top button