

जोतिबा डोंगर, पुढारी वृत्तसेवा : जोतिबा डोंगराच्या पायथ्याला रविवारी पुन्हा बिबट्या दिसला. सायंकाळी चार वाजल्यापासून हा बिबट्या तासभर या परिसरात फिरत असल्याचे भाविक व शेतकर्यांनी पाहिले.
गेल्या दोन महिन्यांपासून जोतिबाच्या पायथ्याला सारकाळ या परिसरात बिबट्या वावरत आहे. रविवारी सायंकाळी जोतिबा दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बिबट्या दिसताच त्यांनी मोबाईलमध्ये त्याची छबी टिपली.
दरम्यान, या ठिकाणी वारंवार बिबट्या दिसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनखात्याने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणी होत आहे.