कोल्हापूर : खून सत्रांमुळे जिल्हा हादरतोय!

कोल्हापूर : खून सत्रांमुळे जिल्हा हादरतोय!
Published on
Updated on

कोल्हापूर, दिलीप भिसे : ऑगस्ट-सप्टेंबर अन् ऑक्टोबर 2022 या काळातील अनेक धीर-गंभीर घटनांमुळे जिल्हा कमालीचा हादरला… गंभीर कारनाम्यांसह थरार माजविणार्‍या खुनांच्या मालिकेमुळे समाजमन सुन्न होत आहे. कागलमधील तिहेरी हत्याकांडाने हळहळ व्यक्त होत आहे. दोन महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आणि थरार माजविणार्‍या 17 खुनांच्या घटनांमुळे सामान्यांसह पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्य अन् जमीन वादातून झालेला रक्तपात कुटुंबीयांची वाताहत करणारा आहे.

गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू असतानाच क्षणिक रागातून शहर परिसरासह ग्रामीण भागात घडलेल्या घटना मनाची घालमेल वाढविणार्‍या ठरल्या आहेत. नवरात्रौत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच दुसर्‍याच दिवशी संशयाचे भूत संचारलेल्या कागल येथील नराधमाने पत्नीसह दोन गोंडस मुलांची क्रूर हत्या घडवून क्रौर्याची परिसीमा गाठली.

माता बचावली… चिमुरडीचा बळी !

थरार माजविणार्‍या घटनेपूर्वी वडणगे (ता. करवीर) येथील मनीषा चव्हाण (वय 23) हिने कौटुंबिक कलहातून सहा महिन्यांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेत माता बचावली; मात्र कोवळ्या तनुजाचा बळी गेला. जन्मदात्रीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. थरकाप उडविणार्‍या घटनांनी जिल्हा गहिवरला… मात्र त्यानंतरही घडणार्‍या एकेका भीषण घटनांमुळे सन्नाटा पसरला…!

गुन्हेगारीचा टक्का लौकिकाला ठरतोय मारक

पुरोगामी विचारधारा जोपासणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा लैकिक आहे. राजकीय आश्रयाने सोकावलेल्या संघटित टोळ्यांसह नामचीन तस्कर, काळेधंदेवाल्यांच्या अमाप उलाढालीमुळे अलीकडच्या काळात गुन्हेगारीचा टक्का वाढतो आहे, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही; मात्र क्षुल्लक कारणातून गंभीर कारनाम्यांचा वाढता आलेख जिल्ह्याच्या लौकिकाला मारक ठरणारा आहे.

समाजमनांसह पोलिस यंत्रणाही चक्रावली !

गुप्तधनाचा मोह, अनैतिक संबंध, लग्नाला नकार, एव्हाना संघटित गुन्हेगारीतून भरदिवसा घडणार्‍या खून-सत्रांमुळे शहर, जिल्ह्यात पोलिस यंत्रणेचा वचक आहे की काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. वैयक्तिक आणि चार भिंतीआड घडणार्‍या थरारक घटनांमुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.

महिलांच्या अमानुष हत्यांनी जिल्हा हादरला!

शुक्रवारपेठ येथील आरती अनंत सामंत ( वय 55) यांचा गुप्तधनाच्या मोहातून तसेच अनैतिक संबंधातून कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील कविता प्रमोद जाधव (34) यांची कसबा बावडा येथे अमानुषपणे झालेली हत्या शहर, जिल्ह्यात खळबळ माजवून सोडणारी आहे. सामंत खूनप्रकरणी एका मांत्रिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

'त्या' मांत्रिकाला अभय…?

मात्र संबंधित महिलेच्या घरात डिसेंबर 2021 मध्ये गुप्तधन शोधण्यासाठी 15 फुटांचा खोल खड्डा खणणार्‍या आणि अमाप संपत्तीचे आमिष दाखवून महिलेसह कुटुंबाचे आर्थिक शोषण करणार्‍या शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील मांत्रिकाला अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news