‘पुढारी’च्या वतीने सीपीआरला आज सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान | पुढारी

‘पुढारी’च्या वतीने सीपीआरला आज सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान

कोल्हापुर, पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने रुग्णांची गरज ओळखून सीपीआरला सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स दिली जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता सीपीआरच्या आवारात कार्यक्रम होईल.

अपघात तसेच आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक असते. यावेळी अपघाताचे ठिकाण ते हॉस्पिटलमधील अंतर पार करताना प्रथमोपचार आवश्यक असतात. दै. ‘पुढारी’च्या वतीने सीपीआरला प्रदान करण्यात येणार्‍या अत्याधुनिक रुग्णवाहिकेत हार्ट अ‍ॅटॅक आलेले रुग्ण, अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, डेफिब, मॉनिटर, सीरिंज पंप, सक्शन मशिन, स्पाईन बोर्ड, स्ट्रेचर या सुविधा आहेत. डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, औषधे ठेवण्यासाठी रॅक, सलाईन देण्याची व्यवस्था, आणीबाणी प्रसंगी अ‍ॅम्ब्युलन्स सायरन माहिती देणार्‍या माईकसह, रात्रीच्या प्रसंगी रस्त्यावर इतर वाहनांसाठी मार्ग मोकळा करून घेताना विशिष्ट रिफ्लेक्टर शीट्स अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित राहणार आहेत.

Back to top button