‘भोगावती’वरील 569 कोटी कर्जाचा आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडू : आमदार पी. एन. पाटील | पुढारी

‘भोगावती’वरील 569 कोटी कर्जाचा आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडू : आमदार पी. एन. पाटील

देवाळे, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भोगावती साखर कारखान्यावर 569 कोटी रुपये कर्ज असल्याचा खोटा आरोप केला आहे. हा आरोप सिद्ध करून दाखवल्यास राजकारण सोडण्यास तयार आहे, असे आव्हान कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी विरोधकांना दिले. देवाळे (ता. करवीर) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले ‘भोगावती’वर 173 कोटींचे कर्ज आहे. विरोधकांनी त्यांच्या काळात साखर कारखाना लुटला असून साहित्य खरेदी दीडशे टक्क्याने केली आहे. स्क्रॅप विक्रीचा आरोप खोटा आहे. कारखाना कर्जातून बाहेर काढून चालवला आहे. ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदय पाटील म्हणाले, विरोधकांकडून पाच वर्षे कारखान्याची बदनामी करण्याचे काम केले आहे.

माजी उपाध्यक्ष एम.आर.पाटील, विजय भोसले, सुरेश कुसाळे, एम. डी. पाटील, आण्णा पाटील, विष्णुपंत पाटील आदींनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते कृष्णराव किरूळकर, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिवाजीराव कारंडे, माजी संचालक बी. ए पाटील, बळवंत तातोबा पाटील, शिवाजी तळेकर यांच्यासह आजी-माजी संचालक, सभासद उपस्थित होते. प्रा. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवास पाटील यांनी आभार मानले.

Back to top button