डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामध्ये उद्या अभिनेता सुमित पाटील यांचे व्याख्यान | पुढारी

डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामध्ये उद्या अभिनेता सुमित पाटील यांचे व्याख्यान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाचा प्रारंभ शनिवारी (दि. 24) होत आहे.

यानिमित्त अभिनेता, कंटेंट क्रिएटर सुमित पाटील यांचे ‘मिम्सचे तंत्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होईल.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसोबतच मिम्समध्ये करिअर करू इच्छिणार्‍या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Back to top button