कोल्हापूर : शिक्षणासोबतच पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मिती

कोल्हापूर : शिक्षणासोबतच पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मिती
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षणासोबतच कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांना पर्यटनासारख्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर 'सारथी' संस्थेचा भर असणार आहे. आगामी काळात राबविण्यात येणार्‍या योजनांसंदर्भात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) पुणे येथील बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आले आहेत.

'सारथी'चे कार्य जलदगतीने करण्यासाठी संकेतस्थळ, फेसबुक, चॅनल व इंटरेक्टिल अ‍ॅप्लिकेशन याकरिता सर्वसमावेशक 'अ‍ॅड्रॉईड अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. तसेच 'सारथी'चे कामकाज अधिक सुलभ व्हावे यासाठी तहसीलदार यांना तालुका समन्वय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा समन्वय अधिकारी व उपायुक्त महसूल यांना विभागीय समन्यय अधिकारी घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सर्वांगीण विकासाच्या योजना

'सारथी' तर्फे इयत्ता 5 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा व प्रवेशासाठी प्रशिक्षण देणे, शालेय-महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थांच्या अभ्यासक्रमांत क्रीडा व सांस्कृतिक विषयाचा नव्याने समावेश करणे, छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे शालेय स्तरावर आयोजन, पीएच.डी. एम.फिल. करणार्‍या सर्व 856 विद्यार्थ्यांना अधिवृत्ती देण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी नवी दिल्ली येथे जाणार्‍या 250 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे अथवा भाड्याने घेण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथ तयार करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ या पुस्तकाच्या हिंदी, कन्नड भाषेत भाषांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (चउऊउ) च्या प्रशिक्षणास मान्यता आणि किल्ले व ऐतिहासिक स्थळे व कृषी पर्यटन, निवास व न्याहरी योजना यांची सांगड घालून पथदर्शी प्रकल्प सादर करण्यात येणार आहे.

शिक्षणासाठीच्या विविध योजना

संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी (चअ) करिता 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन' अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची पूर्तता करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत राष्ट्रीय पात्रता (णॠउ-छएढ) परीक्षेसाठी पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे दरवर्षी 1500 विद्यार्थ्यांना व महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (चक-डएढ) प्रशिक्षणासाठी दरवर्षी 1500 विद्यार्थ्यांना पुणे, नाशिक व औरंगाबाद येथील नामवंत प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

करिअरसाठीचे पाठबळ

बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर व क्लर्क होण्यासाठी खइझड परीक्षेकरिता पुणे, नाशिक व औरंगाबाद येथील नामवंत प्रशिक्षण वर्गामध्ये दरवर्षी 1000 विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारतीय लष्कर, नौदल व वायुदलामध्ये प्रवेशाकरिता 1000 तरुणांना दरवर्षी अग्निवीर, अग्निदूत स्पर्धा परीक्षेसाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर्मन, जपानी, चिनी, रशियन व इतर परदेशी भाषांचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शुल्क सारथीतर्फे दिले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news