हुपरी: ‘जवाहर’ला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार | पुढारी

हुपरी: ‘जवाहर’ला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार

हुपरी; पुढारी वृत्तसेवा: येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनकडून सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने गेल्या 29 वर्षांत उच्च तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक शिस्त, देशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये सर्वोच्च गाळप, ऊर्जा बचत, स्टिम कंझम्शन, बगॅस बचत इत्यादी बाबतीत साखर उद्योगात वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. याचे गुणात्मक परीक्षण करून डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासाठी निवड केली आहे.

कारखान्याने आजपर्यंत शेतकर्‍यांच्या ऊस बिलाची रक्कम, कामगारांचे पगार, शासकीय देणे, बँकांचे कर्ज हप्ते आदी कोणत्याही घटकांचे देणे बाकी ठेवलेले नाही. ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 18 रोजी पुणे येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कारखान्यास यापूर्वीही विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Back to top button