शिवडावच्या माजी पोलिसपाटलाच्या घरी बिबट्याची तीन नखे | पुढारी

शिवडावच्या माजी पोलिसपाटलाच्या घरी बिबट्याची तीन नखे

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : शिवडाव येथे वनविभागाने माजी पोलिसपाटील याच्या घरी आज दुपारी छापा टाकून बिबट्याची तीन नखे, वन्य प्राण्याचे मांस, बंदूक व 13 काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी वसंत महादेव वास्कर (वय 52) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

वसंत वास्कर हा प्राण्यांची शिकार करत असल्याची माहिती वनविभागास मिळाली होती. त्यानुसार सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल युवराज पाटील, अशोक वाडे, किशोर आहेर, सुनील खोत, वनपाल संदीप शिंदे यांनी वास्कर याच्या शिवडाव येथील पुनर्वसन वसाहत सिद्धार्थनगर येथील राहत्या घरी छापा टाकला असता फ्रिजमध्ये ठेवलेले वन्य प्राण्याचे मांस, बिबट्याची तीन नखे, बंदूक व 13 जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी वास्कर याच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Back to top button