

पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागात जोरदार आहे. कोल्हापुरातदेखील पावसाचा जोर वाढला आहे. (Kolhapur Rain Update) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कोल्हापूर यांच्या माहितीनुसार आज (दि. १२) सकाळी ११ वाजेपर्यंत नद्यांवरील एकूण ३६ बंधारे पाण्याखाली गेले होते. तर राजाराम बंधारा पाणी पातळी २६ फूट ८ इंच इतकी होती. (पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.)
ताम्रपर्णी नदीवरील – चंदगड व कुर्तनवाडी,
घटप्रभा नदीवरील – पिळणी, बिजूर भोगोली, कानडे सावर्डे व हिंडगांव,
तुळशी नदीवरील- बीड, कासारी नदीवरील- यवलूज व ठाणे आळवे,