कोल्हापूर : दीड लाख शेतकर्‍यांना ‘पीएम किसान’चे पुढील हप्‍ते नाहीत | पुढारी

कोल्हापूर : दीड लाख शेतकर्‍यांना ‘पीएम किसान’चे पुढील हप्‍ते नाहीत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात ‘पीएम किसान’साठी ई-केवायसी करण्यासाठी बुधवार (दि.7) अखेरचा दिवस होता. आधार कार्ड जोडून ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण न केलेल्या जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 540 लाभार्थ्यांपैकी दिवसभरात केवळ 5 हजार शेतकर्‍यांनीच ती प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे सुमारे 1 लाख 51 हजार शेतकर्‍यांना पीएम किसानचे पुढील हप्‍ते मिळणार नाहीत. ई-केवायसीची मुदतवाढीची मागणी आता होत आहे.

‘पीएम किसान’ योजनेद्वारे दर चार महिन्यांनंतर प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान पात्र शेतकर्‍यांना देण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेचे अकरा हप्‍ते देण्यात आले आहेत. यापुढील हप्‍ते मात्र, ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड जोडणी केली आहे (ई-केवायसी पूर्ण) त्यांचेच जमा होणार आहेत. ज्यांनी ती पूर्ण केलेली नाही, त्यांना या योजनेचे अनुदान (हप्‍ते) मिळणार नाहीत. ही ई-केवायसी करण्याचा आज अखेरचा दिवस होता. मात्र, त्यातही ई-केवायसी करणार्‍यांचे अपेक्षित प्रमाण दिसले नाही.

Back to top button