कोल्हापूर : मांडरे गोळीबारातील दोघा फरारींना अटक | पुढारी

कोल्हापूर : मांडरे गोळीबारातील दोघा फरारींना अटक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मांडरे (ता. करवीर) येथील गोळीबार व हल्‍लाप्रकरणी फरार झालेल्या अभिजित पाटील गटातील प्रकाश शंकर भावके व सर्जेराव शंकर भावके (रा. मांडरे) यांना करवीर पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, प्रतिस्पर्धी उदय सोनबा पाटील याच्यासह 15 जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात वापरलेली 12 बोअरची बंदूक आणि रिकामी पुंगळी मुख्य संशयित अभिजित पाटील याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. रविवारी दुसर्‍या दिवशीही पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. तणाव निवळला असल्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.

बाजीराव पांडुरंग पाटील (रा. मांडरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उदय सोनबा पाटील, विष्णू कृष्णा पाटील, संग्राम सोनबा पाटील, सोनबा कृष्णा पाटील, वैभव विष्णू पाटील, विजय आबासो पाटील, रंगराव आनंदा पाटील, संदीप गोविंद पाटील, आबासो नाना पाटील, अनिल हिंदुराव पाटील, भीमराव भिकाजी पाटील, प्रज्वल भीमराव पाटील, अजय ऊर्फ भाऊसो अनिल पाटील, रोहित अनिल पाटील, आदर्श रंगराव पाटील (रा. सर्व मांडरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button