आर. एम. मोहिते यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर | पुढारी

आर. एम. मोहिते यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

कसबा बावडा ; पुढारी वृत्तसेवा : थील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सन 2022-23 चा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार‘ उद्योजक आर. एम. मोहिते यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी विद्यापीठाचा 17 वा स्थापना आहे, या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.

गुरुवारी सकाळी 10.30 वा. हॉटेल सयाजी येथे पुरस्कार वितरण होणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी मंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल उपस्थित राहणार असल्याची माहिती, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.

केर्ले (ता. पन्हाळा) येथे जन्मलेल्या व केवळ तिसरीपर्यंतच शिक्षण झालेल्या मोहिते यांनी कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग विश्वात मोठे नाव कमावले आहे. त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील आदर्श शिक्षक, व्यवस्थापक पुरस्कार, सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या नावाने आदर्श ग्रंथपाल, कर्मचारी, सेवक पुरस्कार, तसेच गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कारही दिले जाणार आहेत.

Back to top button