कोल्हापूर : गणेश आगमनादिवशी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी

कोल्हापूर : गणेश आगमनादिवशी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : गणेश आगमनादिवशी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

वर्षभरात ध्वनिक्षेपक व ध्वनी वर्धक यंत्रणा आवाजाच्या विहित मर्यादित वापरण्यासाठीचे 14 दिवस यापूर्वीच निश्चित केलेले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी  महत्त्वाच्या सणानिमित्‍त ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी एक दिवस राखून ठेवला होता. त्यानुसार  बुधवारी ( दि.३१)  गणेश आगमनासाठी ही सवलत देण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news