कोल्हापूर : महापुरामुळे 1,200 हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान | पुढारी

कोल्हापूर : महापुरामुळे 1,200 हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मुसळधार पाऊस व महापूर, यामुळे उसापाठोपाठ एक हजार 276 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे, असा कृषी विभागाचा नजर अंदाज आहे. अद्यापही नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात सुमारे 96 हजार हेक्टरवर भात पीक आहे. त्यातील नदीच्या काठावरील जमिनीच्या क्षेत्रातील ऊस काढून त्या क्षेत्रात भात पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. यावेळी महापुराचे पाणी जास्त वाढले नाही; मात्र आठ ते दहा दिवस हे पाणी पिकांत साचून राहिले, त्यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

उसाच्या पानांवर पुराच्या पाण्याचा गाळ साचून राहिल्यामुळे वाढीवर परिणाम होत आहे. महापुरामुळे ऊस, भात याचबरोबर सोयाबीन 25 हेक्टर, भाजीपाला 10 हेक्टर, नाचणी 52 हेक्टर, ज्वारी 11 हेक्टर, फळपिके 9 हेक्टर असे एकूण 36 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Back to top button