कोल्हापूर : दहीहंडीचा थरार! | पुढारी

कोल्हापूर : दहीहंडीचा थरार!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा गोकुळाष्टमीला कोल्हापूरकरांच्या आनंदाला उधाण आले. दहीहंडी फोडण्यासाठी कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या गोविंदांनी थरावर थर रचत उंच मनोरे उभारण्याचा थरार शुक्रवारी अनुभवला. ‘गोविंदा आला रे आला…’ या गीतासह ठसकेदार हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकणारी तरुणाई, नेत्रदीपक लेझर शोच्या झगमगाटात साहसी गोविंदा पथकांच्या प्रयत्नांना टाळ्या व शिट्ट्यांसह नागरिकांनी दाद दिली अन् शहरातील दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे दहीहंडीचा हा साहसी सोहळा होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा शहरातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी कॉनर्र्र, मिरजकर तिकटी, भाऊसिंगजी रोड यांसह ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे या चौकासह संपूर्ण शहरातील रस्त्यांवर सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती.

पावसाने उघडीप दिल्याने दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा सोहळा सुरू होता.

दसरा चौकातील युवा शक्तीची सर्वांधिक बक्षिसांची दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने फोडून तीन लाख रुपयांचे सर्वात मोठे बक्षीस पटकावले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘भगवी’ दहीहंडी ………. पथकाने फोडली. तर मिरजकर तिकटीची शिवसेनेची ‘निष्ठेची’ दहीहंडी …….. पथकाने फोडली. न्यू गुजरी मित्र मंडळाची दहीहंडी ….. पथकाने तर ‘मनसे’ची दहीहंडी …….. गोविंदा पथकाने फोडली.

Back to top button