कोल्हापूर: ‘गोकुळ’ गायीचे दूधही 2 रुपयांनी महागले | पुढारी

कोल्हापूर: ‘गोकुळ’ गायीचे दूधही 2 रुपयांनी महागले

कोल्हापूर;पुढारी वृत्तसेवा: म्हशीच्या दूध दरापाठोपाठ ‘गोकुळ’ने गायीच्या दुधाच्या विक्री दरातही लिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून वाढीव दराची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘गोकुळ’ने काही दिवसांपूर्वीच म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये वाढ केली होती. त्यावेळी गायीच्या दूध विक्री दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय ‘गोकुळ’ने घेतला होता.

‘अमूल’ने दूध विक्री दरात वाढ केल् यानंतर ‘गोकुळ’नेदेखील गाय, टोण्ड व प्रमाणित दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. कोल्हापूर शहर व उपनगरे तसेच जिल् ह्यातील सर्व केंद्रचालक व वितरकांना ‘गोकुळ’ने तसे पत्र पाठविले आहे. या दरवाढीमुळे गाय व टोण्ड दुधाचा दर प्रतिलिटर 46 रुपये, तर प्रमाणित दुधाचा प्रतिलिटर दर 52 रुपये होणार आहे.

दुधाचा प्रकार सध्याचे दर सुधारित दर

गाय दूध (प्रतिलिटर) 44 46
टोण्ड दूध – (प्रतिलिटर) 44 46
प्रमाणित दूध (प्रतिलिटर) 50 52

Back to top button