डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती | पुढारी %

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ रजनीश कामत यांची नियुक्ती जाहीर केली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागात वरिष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ रजनीश कामत यांची नियुक्ती जाहीर केली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागात वरिष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. डॉ. कामत यांचे या निवडीनंतर त्यांना राज्यातील अग्रमानांकित शिक्षण संस्थांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button