कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता, पण आज (दि. ३) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

मात्र, कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्णतेत वाढ झाली होती. पण, आज सायंकाळ पासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस कोल्हापूर, सातारा सह घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 169.72 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे.

जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठा (‘दलघमी’मध्ये)

राधानगरी 169.72
तुळशी 77.98
वारणा 761.42
दूधगंगा 489.18
कासारी 54.92
कडवी 60.02
कुंभी 54.41
पाटगाव 80.66
चिकोत्रा 35.25
चित्री 49.35
घटप्रभा 34.65
आंबेआहोळ 30.98
जंगमहट्टी,जांबरे,कोदे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

केरळच्या अनेक भागात ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार

केरळच्या अनेक भागात ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी आयएमडीने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती.

Back to top button