कोल्हापूर : महीलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; अवयवय दान करण्याचा कुरूंदवाड कुटुंबियांनी घेतला निर्णय

कोल्हापूर : महीलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; अवयवय दान करण्याचा कुरूंदवाड कुटुंबियांनी घेतला निर्णय

कुरुंदवाड; जमीर पठाण : कुरुंदवाड शहर हे पुरोगामी विचारांचे शहर म्हणून परिचित आहे. माणसाने देह सोडला असला तरी तो विचाराने तो जिवंत असतो. या विचारांची शहरात खूप मोठी मांदियाळी आहे. याच विचारांची मनाशी खुणगाठ बांधून एक धाडसी निर्णय कुरुंदवाड येथील बाहुबली जिवाजे यांनी घेतला. ऐन उमेदीच्या काळात आपल्या पत्नीचे अपघाती निधन झाले. पण अशा परिस्थितीत नाउमेद न राहता पत्नीचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपली सौभाग्यवती अवयवाच्या रूपाने या पृथ्वीस्थळावर रहावी हा दृष्टिकोन त्यांनी बाळगला. याच दृष्टिकोनातून त्यांनी पत्त्नीचे अवयव दान केले.

पत्नीची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर निष्फळ ठरली. तीने देह सोडल्यानंतर अवयवाच्या रूपाने या जगात ती रहावी या हेतूने जिवाजे कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण जगासमोर एक आदर्श ठरला आहे.

येथील प्रगतशील शेतकरी बाहुबली जिवाजे यांच्या पत्नी प्रतिभा जिवाजे (वय ३८) ह्या शुक्रवार दिनांक २२ रोजी आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी अब्दुललाट येथे गेल्या होत्या. मुलीला सोडून परत येताना त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्या रस्त्यावर पडल्या. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे मेंदूच्या सर्जरीसाठी दाखल करण्यात आले. मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना पुन्हा एक्सन हॉस्पिटल इचलकरंजी येथे हलविण्यात आले. मेंदूला जबर मार लागल्याने आणि नेत्राच्या शिरा तुटल्याने त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली पण त्यांनी मृत्युशी दिलेली झुंज अखेर काल अपयशी ठरली.

त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचे डोंगरच कोसळले. हॉस्पिटलमधील त्यांचे ओक्साबोक्सी रडणे पाहून अनेकांनाही रडू आवरत नव्हते अशातच त्यांना सांगली येथील डॉ.पंकज कुपवाडे यांनी धीर देत एक सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, विचाराने अवयवाने त्या आपल्यातच राहाव्यात असे वाटत असेल तर अवयव दान करणे हे योग्य राहील असा सल्ला दिला. यानंतर सासर-माहेरच्या दोन्ही कुटुंबीयांनी हा निर्णय घेऊन २ अंध व्यक्तींना नेत्र रोपण तर एका महिलेला त्वचा रोपण करण्यात आली.

ऐन उमेदीच्या वयात निधन झाल्याने प्रतिभा या अवयवाच्या रूपाने या जगात रहाव्यात, नेत्राच्या रूपाने जग पहावे ही विचारघाट मनाशी बांधून कुटुंबीयांनी हे अवयव दान केले. हे अवयव काही जणांच्या शरीरासाठी उपयोगी पडले हे प्रेरणादायी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news