मुख्यमंत्र्यांची भेट स्वागतासाठीच : विनय कोरे | पुढारी

मुख्यमंत्र्यांची भेट स्वागतासाठीच : विनय कोरे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आपण भेट घेतल्याचे जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सोमवारी सांगितले.

कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांनी विमानतळावर भेट घेतली. मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत आपल्या नावाची चर्चा आहे. याबाबत आजच्या भेटीमध्ये काही चर्चा झाली का, असे विचारता आ. कोरे म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे अचानक निधन झाले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात आले.

मात्र, निवडीनंतर प्रथमच एकत्र कोल्हापुरात आले. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदार संघातील कार्यक्रमामुळे स्वागतासाठी उपस्थित राहता आले नाही. यामुळे शिंदे आणि फडणवीस मुंबईला परत जात असताना त्यांची भेट घेतली. सर्व प्रक्रियेमध्ये आपण सहभागी आहोत, मात्र आजची भेट स्वागतासाठीच होती, असेही आ. कोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

Back to top button