कोल्हापूर : विवाहिता पाय घसरून पडली; पोटातील जुळ्या अर्भकांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : विवाहिता पाय घसरून पडली; पोटातील जुळ्या अर्भकांचा मृत्यू

कोल्हापूर : रांगोळी (ता. हातकणंगले) येथे विवाहिता पाय घसरून पडल्याने तिच्या पोटातील जुळ्या अर्भकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.

पूजा अहिरवार (वय 37, रा. आत्मज, मध्यप्रदेश) असे त्या विवाहितेचे नाव आहे. पूजा ही पाच महिन्यांची गर्भवती होती. पहाटे चारच्या सुमारास ती सध्या राहत असलेल्या घरात पाय घसरून पडली. तिला तातडीने उपचारासाठी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिने दोन अर्भकांना जन्म झाला. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले असता दोन्ही नवजात मुलींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

Back to top button