कोल्हापूर : ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद | पुढारी

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ओबीसी आरक्षणावर राजकीय श्रेयवाद रंगला आहे. आरक्षण केवळ महाविकास आघाडीमुळेच मिळाले आहे, असा दावा महाविकास आघाडीच्?या पदाधिकार्‍यांनी केला. भाजपने सत्तेत आल्?यास तत्?काळ ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्?याचे दिलेले आश्?वासन पूर्ण केल्?याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला.

आ. सतेज पाटील म्हणाले , ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी बांठिया आयोगाची नेमणूक महाविकास आघाडी सरकारने केली होती. या समितीने तयार केलेला अहवाल हा आरक्षणाला पूरक असाच होता. गेल्या वर्षभरापासून हे काम गतीने सुरू होते. त्?यामुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्?याचा मार्ग मोकळा झाला. याचे सर्व श्रेय हे महाविकास आघाडी सरकारचे आहे.
भाजपचे महानगर अध्?यक्ष समरजितसिंह घाटगे म्?हणाले, राज्?यात भाजपची सत्ता आल्?यानंतर मी ओबीसी आरक्षण देऊ शकलो नाही तर राजकारण सोडेन, असा शब्?द दिला होता. हा शब्?द खरा करून दाखवला याबद्दल मुख्?यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्?यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! मुळातच आरक्षणाचा घोळ हा महाविकास आघाडी सरकारमुळे झाला. ज्?या गोष्?टीला दोन ते तीन महिने लागणार होते त्?यासाठी एक वर्ष लावले. मध्?य प्रदेश सरकारने एक महिन्?यात हे आरक्षण दिले. महाराष्?ट्रात अवघ्?या वीस दिवसांत ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला.

शिवसेनेचे जिल्?हाप्रमुख संजय पवार यांनी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्?याचे श्रेय हे महाविकास आघाडी सरकारचे असल्?याचे सांगितले. त्?याचे श्रेय अन्?य कोणत्?याही पक्षाला घेण्?याचा अधिकार नाही. मुख्?यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देऊ असा शब्?द दिला होता. त्?याची पूर्तता केली आहे. राष्?ट्रवादी काँग्रेसचे जिल्?हाध्?यक्ष ए. वाय. पाटील यांनीही बांठिया आयोग हा महाविकास आघाडी सरकारच्?या काळात नेमला होता. या आयोगाचा अहवाल मान्?य केल्?याने ओबीसी समाजाला न्?याय मिळाला आहे, असे सांगितले.

Back to top button