खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा?

खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा?
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले संजय मंडलिक व धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटासोबत राहणार असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंडलिक व माने हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. हे दोन्हीही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करतील. या दोघांनी एकाच वेळी हा निर्णय जाहीर करावा, अशी प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, धैर्यशील माने यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयातील जाचक अट दूर कराव्यात, अशी मागणी केली होती. हा निर्णय जाहीर करताना शिंदे यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

मंडलिक 'नॉट रिचेबल'; भागात असल्याचा कार्यालयाचा दावा क्षीरसागर यांच्या दाव्यानंतर संजय मंडलिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते 'नॉट रिचेबल' होते. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, खासदार मतदारसंघात असल्याची माहिती देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news