कर्तव्यात कसूरप्रकरणी सहायक फौजदार बडतर्फ | पुढारी

कर्तव्यात कसूरप्रकरणी सहायक फौजदार बडतर्फ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या गुह्याच्या तपासामध्ये गंभीर चुका, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय परराज्यात तपास अशातून कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत सहायक फौजदाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. संजय एस. लोंढे असे त्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी हा आदेश केल्याची माहिती गृह उपअधीक्षक प्रीया पाटील यांनी सांगितले.

संजय लोंढे हा 2016 मध्ये हुपरी पोलिस ठाण्यात सहायक फौजदार पदावर कार्यरत होते. हुपरी पोलिस ठाण्यामध्ये एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार संजय लोंढे करीत होता. तपासामध्ये अनेक गंभीर चुका केल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे चौकशी अहवाल गृह विभागाकडे पाठविला होता. या चौकशीमध्ये संजय लोंढेने कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आले होते.

यानंतर लोंढेला पोलिस मुख्?यालयाकडे बदली करण्यात आले.आरोपींना मदत करण्याचा हेतूने, गुह्याच्या तपासासाठी वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात जाणे अशा त्रुटी समोर आल्या. याबाबतचा अहवाल गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. यावरून लोंढे याच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रीया पाटील यांनी सांगितले.

Back to top button