डॉ. संजय डी. पाटील यांना ‘आऊटस्टँडिंग लीडरशीप’ अ‍ॅवार्ड | पुढारी

डॉ. संजय डी. पाटील यांना ‘आऊटस्टँडिंग लीडरशीप’ अ‍ॅवार्ड

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना आर्डोर-कॉम मीडिया ग्रुपच्या वतीने ‘आऊटस्टँडिंग लीडरशीप इन हायर एज्युकेशन-2022’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नावीन्यपूर्ण प्रयोग व संशोधन कार्यास दिलेल्या पाठबळाची दखल घेऊन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

ग्रुपतर्फे ‘हायर एज्युकेशन अँड इडिटेक कॉन्क्लेव अँड अ‍ॅवार्डचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळूर येथे द चान्सेरी पॅव्हेलियन हॉटेलमध्ये 15 जुलैला डॉ. संजय पाटील यांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे-कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे या तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून ते कार्यरत आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरेपी, हॉस्पिटलिटी कॉलेज, विविध शाळा, महाविद्यालये अशा 172 संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.

Back to top button