Hasan Mushrif : थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीच्या आधी आलेच पाहिजे : हसन मुश्रीफ | पुढारी

Hasan Mushrif : थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीच्या आधी आलेच पाहिजे : हसन मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: थेट पाईपलाईन योजनेच्या कामावर जादा मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वापरा. अपुरी कामे तत्काळ पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत थेट पाईपलाईनमधून दिवाळीच्या आधीच पाणी आलेच पाहिजे, अशी सूचना माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बैठकीत दिल्या. या वेळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारालाही चांगलेच धारेवर धरले. सासने ग्राउंडजवळच्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित थेट पाईपलाईन संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

Hasan Mushrif : योजना पूर्ण होण्याआधीच शंभर टक्के निधी खात्यावर जमा

मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की, या योजनेची कामे गतीने पूर्ण करीत असताना अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी निधीची अडचण सांगता कामा नये. कारण योजना पूर्ण होण्याआधीच योजनेचा शंभर टक्के निधी खात्यावर जमा झालेला आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील कदाचित अशी ही पहिलीच योजना असेल.यावेळी त्यांनी नगरविकास विभागाकडून आणलेल्या निधीचा प्रभाग निहाय झालेला वापर, कार्यालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली कामे, यादवनगरमधील घरकुलांच्या मालकी हक्काचा प्रश्न या संदर्भात सविस्तर आढावा घेतला.

माजी महापौर आर. के. पवार म्हणाले, महापालिकेची नगरसेवक संख्या ८१ वरून ९२ झालेली आहे. त्यासाठी मोठ्या सुसज्ज व अद्ययावत सभागृहाची गरज आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने असलेले सदस्य बसणार कोठे?, असा सवालही त्‍यांनी केला.

यावेळी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रवी अडसूळ, सहाय्यक आयुक्त सुहास औंधकर, शहर उपाभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, एन. एस. पाटील, बाबुराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदीसह राजेश लाटकर, आदिल फरास, विनायक फाळके, उत्तम कोराने, अनिल कदम, संदीप कवाळे, रमेश पवार, सतीश लोळगे, प्रकाश कुंभार, प्रकाश पाटील, प्रकाश गवंडी, तात्या खेडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button