कोल्हापूर : मृत्यूचा ‘महामार्ग’

कोल्हापूर : मृत्यूचा ‘महामार्ग’
Published on
Updated on

कोल्हापूर : दिलीप भिसे :

'ती' 50 प्रमुख ठिकाणे धोकादायक

जिल्ह्यांतर्गत बहुतांशी रस्ते चकाचक आणि तीन, चार पदरी झाले खरे… पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बेपर्वाई आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे शहर, जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचा आलेख वाढतच चालला आहे. वाहतूक नियंत्रणाच्या अभावामुळे अपघातांची स्थिती गंभीर बनत चालली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत 1 जानेवारी ते 25 जून 2022 या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. शिवाय घरातील कर्त्यांच्या मृत्यूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

अपघाताचे 50 ब्लॅक स्पॉट

पुणे-बंगळूर, रत्नागिरी-नागपूर व कोल्हापूर-गोवा या मार्गांवर अनेक ठिकाणे अपघातांचे ब्लॅक स्पॉट ठरत आहेत. त्यात प्रामुख्याने किणी टोलनाका, वाठार फाटा, अंबप फाटा, टोप, शिरोली एमआयडीसी, सांगली फाटा, तावडे हॉटेल, उचगाव ब—ीज, उजळाईवाडी उड्डाण पूल, शाहू टोलनाका, गोकुळ शिरगाव, लक्ष्मी टेकडी.

कोल्हापूर-सांगली मार्गावर माले फाटा, हालोंडी, हेर्ले, चोकाक, हातकणंगले बसथांबा परिसर, इचलकरंजी फाटा, चौंडेश्वरी फाटा, नांदणी नाका.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर करुळ घाट, सांगशी, आसळज कारखाना वळण, मार्गेवाडी, साळवण, साखरी, लोंघे, खडुळे पूल, परखंदळे, आसगाव, मोहरी,भामटे-कळंबे वळण.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : शिवाजी पूल, वडणगे फाटा, सोनतळी, रजपूतवाडी, केर्ली फाटा, वाघबीळ, बोरपाडळे फाटा, पैजारवाडी, बांबवडे, मलकापूर, शिराळा फाटा, आंबा.

वारकरी मार्गही असुरक्षित !

मिरज-पंढरपूर महामार्गावर केरेवाडी फाट्याजवळ चार दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार्‍या वारकर्‍यांच्या दिंडीत जीप घुसली. या दुर्घटनेत 14 वारकरी जखमी झाले. वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व कर्नाटक, गोव्यातील सर्वच दिंड्या मिरजमार्गे पंढरपूरला मार्गस्थ होत असतात. त्यामुळे या काळात या मार्गावर टप्प्या-टप्प्यावर वाहतूक नियंत्रणासाठी परिपूर्ण यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे. वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे पंढरपूर मार्गावर वारंवार
अपघाती घटना घडत राहिल्याने मिरज-पंढरपूर मार्ग असुरक्षित बनू लागला आहे.
दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी व्यापक नियोजनाची गरज आहे.

भीषण अपघाताच्या ठळक घटना

2 जुलै : पुणे-बंगळूर महामार्गावर किणीजवळ मोटार-ट्रक-कंटेनर अशा तिहेरी अपघातात बंगळूर येथील चौघांचा मृत्यू
4 जून : पुणे-बंगळूर महामार्गावर कासेगावजवळ येवलेवाडी फाटा ( वाळवा) येथे भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जण ठार 7 जून : शाहूवाडी : बांबवडे-कोकरूड मार्गावर भरधाव वाहनाची धडक : सागाव (ता. शिराळा) येथील आकाश चोपडे (वय 26) याचा उजवा पाय तुटला. मित्रही गंभीर 10 जून : गडहिंग्लज : भडगाव हिरण्यकेशी नदी पुलावर वाहनाची धडक : 'रिपाइं'चे शिवाजी

कांबळे यांचा मृत्यू

11 जून : इचलकरंजी : स्कूल बस-एसटी अपघातात 10 प्रवासी जखमी 16 जून : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दुचाकी-जीप अपघात : असंडोलीतील अनिल कुंभार यांचा मृत्यू / याचदिवशी पुणे-बंगळूर महामार्गावर संकेश्वरजवळील अपघातात निलजी (ता. गडहिग्लज) येथील बाहुबली देवण्णावर यांचा मृत्यू 19 जून : शिरवळ (खंडाळा) उड्डाण पुलाजवळ भादोले (ता.हातकणंगले) येथील मायाप्पा माने या दिंडीतील वारकर्‍याचा मृत्यू 22 जून : इचलकरंजी पंचगंगा पुलावर दुचाकी-मोपेड अपघातात कोरोची (ता. हातकणंगले) येथील एकाचा मृत्यू 25 जून : अंबप (ता. हातकणंगले) जवळील अपघातात रिक्षाचालक ठार 26 जून : गडहिग्लज : कंटेनर अपघातात डॉक्टर तरुणी ठार

कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-रत्नागिरी व पुणे-बंगळूर महामार्ग अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे धोकादायक ठरू लागले आहेत. चालकांची बेफिकिरी आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे महामार्गच अपघातांचा 'ब्लॅक स्पॉट' ठरत आहे. 1 जानेवारी ते 25 जून 2022 या 175 दिवसांच्या कालावधीत शहर, जिल्ह्यात किंबहुना महामार्गावरील 570 अपघाती घटनांमध्ये 235 निष्पापांना जीव गमवावा लागला, तर 750 हून अधिक लोक जायबंदी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news