कोल्हापूर : पावणेचार लाखांचा गांजा पकडला; दोघांना बेड्या | पुढारी

कोल्हापूर : पावणेचार लाखांचा गांजा पकडला; दोघांना बेड्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शहरासह जिल्ह्यात गांजा तस्करी करणार्‍या रॅकेटच्या सूत्रधारासह साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकून 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा साठा हस्तगत केला. रमेश दादासाहेब शिंदे (वय 44, रा. विक्रमनगर) व समाधान मारूती यादव (29, रा. घाटंग्री, जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

तस्करी रॅकेटमध्ये काही गुन्हेगारी टोळ्यांतील साथीदारांचे कनेक्शन असावे, असा पोलिसांना संशय आहे. त्याद‍ृष्टीने चौकशी सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले. संशयित शिंदे, यादव शहर व जिल्ह्यात गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यावर पाळत होती.राजाराम तलाव तसेच शेंडा पार्क येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणात उलाढाली होत होत्या.

राजाराम तलाव परिसरात संशयित मोटारीतून दाखल झाले. पोलिस निरीक्षक गोर्ले, उपनिरीक्षक मोरेसह पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कारच्या तपासणीत 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा 31 किलो 130 ग्रॅम गांजा, मोबाईल हँडसेट, मोटार असा 9 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला.

Back to top button