कोल्हापूर : चला शिकूया, फ्रेश सूप अन् टेस्टी स्टार्टर | पुढारी

कोल्हापूर : चला शिकूया, फ्रेश सूप अन् टेस्टी स्टार्टर

कोल्हापूर : पावसाळ्याचे दिवस आले आहेत आणि काही दिवसांत पावसाला दमदार सुरुवातही होईल. अशा वेळी मस्त गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होते. काही ठराविक सुप्स आणि स्टार्टर आपण हॉटेलमधून मागवत असतो; पण वेगवेगळे बरेच सूप आणि स्टार्टरचे प्रकार आहेत. मग अशावेळी असे मस्त टेस्टी गरम पदार्थ घरच्या घरी बनवून दिले तर मुलांबरोबरच घरातले प्रौढही खूश होऊन जातील आणि त्याचबरोबर पैशांची बचतही होईल.

म्हणूनच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबमार्फत फ्रेश सूप अन् टेस्टी स्टार्टर वर्कशॉप आयोजित केला आहे. शनिवार, दि. 25 जून रोजी दु. 12.30 वाजता, टोमॅटो एफ. एम. ऑफिस, वसंत प्लाझा, बागल चौकाजवळ, कोल्हापूर येथे हा वर्कशॉप होणार असून, वर्कशॉपसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

या वर्कशॉपमध्ये लेमन कोरिएंडर सूप, पास्ता सूप, मिक्स व्हेज, क्रिमी टोमॅटो, स्वीट कॉर्न इत्यादी सूप प्रकार तसेच पनीर चिली, गोल्ड कॉईन, बेबी कॉर्न सिगार, चीज चिली बाईज, पनीर पापड डिलाईट, व्हेज क्रिस्पी कटलेट आणि गोबी 65 इत्यादी स्टार्टर प्रकार घेतले जाणार आहेत. प्रत्येक सदस्यास पदार्थांच्या प्रिंटेड नोट्स दिल्या जातील. कस्तुरी क्लब सदस्यांना या वर्कशॉपसाठी फक्‍त 300 रुपये, तर इतरांना 600 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी 8483926989 व 9096853977 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Back to top button