कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरचा संकल्प | पुढारी

कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरचा संकल्प

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आरोग्यास घातक असणार्‍या गुटखा मावा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही. तसेच सार्वजनिक थुंकणार नाही, असा थुंकीमुक्त कोल्हापूरचा संकल्प शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने जुना राजवाडा येथे करण्यात आला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने टीबी, कॅन्सर, न्यूमोनिया, स्वाईन फ्लू, कोरोना तसेच श्‍वसनाचे आजार होतात म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, असा संकल्प केला. आमच्या अन्य सहकार्‍यांना आरोग्य आणि स्वच्छतेचे धडे पटवून देऊन माझे घर परिसर, माझी शाहूनगरी पर्यायाने माझा देश स्वच्छ, सुंदर, निरोगी बनवण्याचा प्रयत्न करेन, अशी शपथ घेऊन लोकराजाला वंदन केले.

यावेळी प्राचार्य डी. व्ही. पाटील यांनी शाहू महाराजांनी विविध धर्म, जातीसाठी जी काही वसतिगृह उभारली त्यामुळे बहुजन समाजातील सुशिक्षित बनली. आज मोठमोठ्या हुद्द्यावर या वसतिगृहातील मुले कार्यरत आहेत.

या अभियानाचा प्रारंभ शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष राहुल चिकोडे, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, दीपा शिपूरकर, ललिता गांधी आदी उपस्िथत होते.

Back to top button