दहावी पुरवणी परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया आजपासून | पुढारी

दहावी पुरवणी परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया आजपासून

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 20 जूनपासून सुरू होईल. बारावीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू झाली आहे.

मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले आहे. 12वीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची लेखी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट तर व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 21 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

10 वीची लेखी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होईल. 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 8 ऑगस्ट व 10 वीच्या परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 26 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक ुुु.ारहरहीीललेरीव.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव डी. एस. पोवार यांनी दिली.

Back to top button