कोल्हापूर : तुकाराम महाराज पालखीसाठी जरी पताका वंशजांकडे सुपूर्द

कोल्हापूर : तुकाराम महाराज पालखीसाठी जरी पताका वंशजांकडे सुपूर्द

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुका पालखी मिरवणुकीने पंढरपूरला जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न औरंगजेबाच्या काळात झाला होता. त्यांच्या सैन्याकडून होणारा हा त्रास दूर करून पालखीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिले होते. त्यानंतर छत्रपती घराण्याकडून स्वराज्याचे निशाण म्हणून जरी पताका देण्याला सुरुवात झाली. संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार्‍या या जरी पताकाचे पूजन रविवारी संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.

छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल सैन्यापासून या पायी दिंड्यांना संरक्षण दिले होते. पुढे ही भूमिका छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांनी कायम ठेवली. पालखी सोहळ्याच्या सोबत स्वराज्याचे निशाण म्हणून जरी पताका देण्याची प्रथा सुरू आहे.

संभाजीराजे यांच्या हस्ते जुना राजवाडा येथे रविवारी जरी पताका पूजन करण्यात आले व सदर जरी पताक्याचे मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळेला शहाजीराजे व मानकरी प्रा. तळेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news