कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत उचगावचा युवक ठार | पुढारी

कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत उचगावचा युवक ठार

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोपनजीक आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने उचगाव (ता. करवीर) येथील युवक ठार झाला. विशाल रामा वाळकुंजे (वय 19) असे त्याचे नाव आहे. रविवारी दुपारी चार वाजता हा अपघात घडला.

विशाल कामानिमित्त टोप येथील बिरदेव मंदिर परिसरात नातेवाईकांकडे आला होता. काम उरकून गावी जाताना त्याच्या मोटारसायकलला (एम एच 09 सी क्यू 7346) पुण्याहून बंगळूरकडे जाणार्‍या आयशर ट्रकने (केए 22 बी 5782) पाठीमागून जोराची धडक दिली. कंबरेवरून चाक गेल्याने विशाल गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली नव्हती.

Back to top button