कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून पाच लाखांची फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून पाच लाखांची फसवणूक

गांधीनगर : पुढारी वृत्तसेवा
बनावट सोने तारण ठेवून श्री. वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर शाखा गांधीनगर येथून एकूण चार लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महेश नामदेव माळी (रा.काजवे गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर गांधीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबतची फिर्याद शाखाधिकारी विकास पाटील (रा. टोप, ता.हातकणंगले) यांनी दिली. महेश माळी याने चांदीचे दागिने बनवून त्याला सोन्याचा मुलामा देऊन ती सोन्याचे दागिने असल्याचे सांगून वसंतराव चौगुले पतसंस्थेतून दि.1 जून 2022, 4 जून 2022 व 16 जून2022 रोजी एकूण चार लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलून संस्थेची फसवणूक केली असल्याची फिर्याद शाखाधिकारी पाटील यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Back to top button