कोल्हापूर : महिन्यात खाद्यतेल सात रुपयांनी स्वस्त | पुढारी

कोल्हापूर : महिन्यात खाद्यतेल सात रुपयांनी स्वस्त

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पुरवठा वाढल्यामुळे खाद्यतेलाची विक्री करणार्‍या विविध कंपन्यांनी मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये कपातीची घोषणा केली आहे; पण कोल्हापूरच्या बाजारपेठेत या तेलांच्या किमती स्थिर आहेत. महिन्याभरात खाद्यतेल सात रुपयांनी उतरले आहे. मुंबई मार्केट कमिटीत डाळींच्या किमती किलोमागे 4 ते 5 रुपयांनी घसरल्या आहेत. कोल्हापूर बाजार समितीत डाळींचे दर ‘जैसे थे’ आहेत. डिझेलच्या किमती वाढल्यानंतर ही दरवाढ झाल्याचे माहिती किराणा व्यापारी असोसिएशने दिली.

क्विंटल व किलोचा दर : साखर 3750 (किलो 40 रुपये), खाद्यतेल (15 लिटर) – सूर्यफूल 3075 (लिटर 205 रु.), शेंगदाना तेल- 2775 (किलो 190 रु.) सरकी डबा – 2700 (किलो 180 रु.), सोयाबीन तेल-2475 (लिटर 165 रु.), पामतेल तेल-2175 (लिटर 145 रु.), खोबरेल तेल 2550 (किलो 280 ते 260 रु.), तांदूळ क्विंटल 3800 ते 8000, बिर्याणी राईस 100 ते 200 रुपये किलो, गहू 2600 ते 3800 (गहू प्रतवारीनुसार प्रतिकिलोस 27 ते 38 रुपयांची वाढ ), बाजरी 1800 ते 3200, ज्वारी 2800 ते 5000 (किलो 48 रु.). डाळी (किलो दर ) : तूरडाळ 95 ते 110, हरभरा डाळ 68 ते 72, मूगडाळ 100 ते 110, मसूर डाळ 94 ते 100, मूगडाळ 100 ते 110, तूरडाळ 100 ते 110, मटकी 160, उडीद डाळ 100 ते 110, चवळी 90 ते 120, मसूर 110 ते 340, मूग गावरान 90 ते 100, वाटाणा हिरवा 100 ते 120, काळा वाटाणा 70 ते 80, काबुली चणा 100 ते 140, साबुदाणा 56 ते 68, खोबरे 180 ते 220, शेंगदाणा 100 ते 130, पोहे 40 ते 48, दगडी पोहा 60 रुपये.

कडधान्यांसह मसाल्याचे किलोचे दर – तीळ 150 ते 180, मेथी 100, मोहरी 100 ते 120, जिरे 320, बडिशेप 280 ते 360, धने 200, लसून 80 ते 120, दालचिनी 400 ते 600, बदाम फूल 1200 ते 1500, मसाला वेलची 1000 ते 1400, त्रिफळ 700, नाकेश्वर 1500 ते 2500, हिंग 600 ते 800, काळी मिरी 600 ते 900, शहाजिरे 700 ते 1200, रामपत्री 800 ते 1200, जायपत्री 2200 ते 3000, हिरवी वेलची 1600 ते 2000, जायफळ 800 ते 1200, हळकुंड 140 ते 180, धोंड फूल 600 ते 1000, मीठ मोठे 10 ते 15, तमालपत्री 80 ते 120, गूळ 50 ते 60 रुपये.

Back to top button