धनंजय महाडिक यांची दै. ‘पुढारी’स भेट | पुढारी

धनंजय महाडिक यांची दै. ‘पुढारी’स भेट

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी दै. ‘पुढारी’स सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी महाडिक यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी धनंजय महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. महाडिक यांनी दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, भूषण पाटील, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, अशोक देसाई आदी उपस्थित होते.

Back to top button