जीएसटी पडताळणीत कोल्हापूर सर्वोत्कृष्ट | पुढारी

जीएसटी पडताळणीत कोल्हापूर सर्वोत्कृष्ट

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जीएसटी विवरण पत्र पडताळणीत कोल्हापूर विभागाचे काम सर्वोत्कृष्ट ठरले आहे, त्यामुळे महसूल वाढीसाठी मदत होत असल्याचे कोल्हापूर विभागाचे अप्पर आयुक्त विकास मस्के यांनी सांगितले. प्रा.पी.बी. चव्हाण प्रतिष्ठान, तासगाव आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय जीएसटी, कोल्हापूरचे अपर आयुक्त राहुल गावंडे अध्यक्षस्थानी होते.

मस्के म्हणाले, जीएसटी स्थिरावत असताना 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी विवरण पत्र पडताळणी कोल्हापूर विभागाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे राज्याच्या आयुक्तांनी कौतुक केले आहे. राहुल गावंडे म्हणाले, केंद्रीय जीएसटी व राज्य कर विभागातर्गंत कोल्हापूर विभागात चांगला समन्वय आहे. यामुळे गेल्या वर्षीपेक्षा महसुलात चांगली वाढ झाली आहे. संयुक्त आयुक्त सुनीता थोरात म्हणाल्या, महसूल वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अभय योजनेचा करदात्यानी लाभ घ्यावा. ज्येष्ठ कर सल्लगार अविनाश चव्हाण, आयकर उपसंचालक अमित खटावकर, केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्त किशोर गोहिल, राज्य कर कोल्हापूरच्या उपायुक्त वैशाली काशीद, उपायुक्त शर्मिला मिस्कीन, सांगलीचे उपयुक्त सुनील कानगुडे, उपायुक्त महादेव लवटे, केंद्रीय जीएसटी सांगलीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. बी. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत साळुंखे यांनी संयोजन केले.

यावेळी राज्य कर विभाग कोल्हापूरचे संयुक्त आयुक्त समरजीत थोरात, आर. बी. पाटील, सहायक आयुक्त सुनील शिंदे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रमाकांत मालू, राम पाटील, रणजित खांडेकर, चंद्रकांत खरमाटे, सुभाष पिसाळ, कर सल्लागार प्रशांत चिपरे, सविता चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Back to top button