परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. अजितसिंह जाधव | पुढारी

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. अजितसिंह जाधव

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रा. डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव यांची निवड करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने शनिवारी ही घोषणा केली.

डॉ. जाधव हे सध्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे परीक्षा नियंत्रक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहात त्यांनी 1993 मध्ये अधिव्याख्याता पदापासून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर सहायक प्राध्यापक, अधिविभाग प्रमुख, डी.वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य व प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष), अधिष्ठाता (अभियांत्रिकी विद्याशाखा), अध्यक्ष, अभ्यास मंडळ (इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) आदी विविध जबाबदारीच्या पदांवर कार्य केले आहे.

11 मे 1968 रोजी जन्मलेल्या डॉ. जाधव यांचे मूळ गाव मेडशिंगी (ता. सांगोला, जि. सोलापूर) आहे. त्यांनी 1990 मध्ये शिवाजी विद्यापीठातूनच इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी (बी. ई.) घेतली. यानंतर वालचंद महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (एम. ई.) घेतली. त्यानंतर राजस्थानच्या सिंघानिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. विद्यार्थीभिमुख सुधारणा करण्यावर भर या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह निवड समितीच्या सर्वच सदस्यांचा आभारी आहे. कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक विद्यार्थीभिमुख सुधारणा करण्यावर माझा भर राहील, असे डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

 

Back to top button