कोल्हापूर : पाल बुद्रुक येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध | पुढारी

कोल्हापूर : पाल बुद्रुक येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

धामोड; पुढारी वृत्तसेवा : पाल बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पास गेल्याच आठवड्यात मंजुरी मिळाली आहे. सोबत या प्रकल्पास २७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. परंतु, लघु पाटबंधारे प्रकल्पास आम्हांला प्रकल्प नको, पाणी नको, अशा घोषणा देत मोहितेवाडी व नागदेववाडी येथील ग्रामस्थांनी या प्रकल्‍पाला तीव्र विरोध केला.

या प्रकल्पामुळे राधानगरी तालुक्यातील पाल बुद्रुक, पाल खुर्द, नागदेववाडी, मोहितेवाडी तर करवीर तालुक्यातील चव्हाणवाडी, भोगमवाडी, घानवडे व आरळे आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार प्रक्राश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न करून मंजुरी मिळवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधलेल्या ५३ प्रकल्यांपैकी एकाही प्रकल्पातील लोकांचे पुनवर्सन तीस-चाळीस वर्षांत पूर्ण झालेले नाही. यामुळे पुनर्वसन विभाग, पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र सरकारवर आमचा विश्वास नाही. आम्हांला प्रकल्प नको, पाणी नको, अशा घोषणा देत मोहितेवाडी व नागदेववाडी येथील नागरिकांनी प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच आमदार आबिटकर यांना विरोध नसून पुनर्वसन विभाग व सरकारवर आमचा विश्वास नाही, असे मत यावेळी शेतकरी बळवंत जाधव यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button