पेट्रोल-डिझेलच्या दरात अजून बदल नाही….!!!! | पुढारी

पेट्रोल-डिझेलच्या दरात अजून बदल नाही....!!!!

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कमी करून इंधन दरकपात केली आहे; पण राज्य सरकारच्या कपातीची कंपनीकडून अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याने पंपावर ही दरकपात झाली नसल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोशिएशनच्या वतीने प्रसिद्ध केले आहे. कदाचित ही अंमलबजावणी मंगळवार (दि.२३) पासून होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दराने होरपळणाऱ्या जनतेला शनिवारी केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही याबाबत रविवारी (दि.२२) मोठा निर्णय घेऊन इंधन दर कपात केली.

केंद्राने इंधन दर कपात केल्यानंतर राजस्थान, ओडिसा,  महाराष्ट्र राज्य सरकारनेही पेट्रोलवर २ रुपये ८ पैसे तर डिझेल वर १ रुपये ४४ पैशांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. भाजपशासित १२ पेक्षा अधिक राज्यात अजून करकपात झाली नसून, महाराष्ट्राच्या या कपातीमुळे तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

हे वाचलंत का ?

Back to top button