कोल्हापूर : अंध बांधवांच्या गायन, वादन स्पर्धांचे आयोजन | पुढारी

कोल्हापूर : अंध बांधवांच्या गायन, वादन स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंध, दिव्यांग बांधवांच्या भाळी नियतीने अंधार लिहिला असला, तरी त्या तिमिरावर मात करत त्यांच्या गायन, वादन कौशल्याने ते रसिक प्रेक्षकांना जादुई संगीत मैफिलीचा आनंद देत तृप्त करणार आहेत. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त अंध कलाकारांना हक्काचे स्पर्धात्मक व्यासपीठ देत त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड संस्थेच्या वतीने अंध बांधवांच्या गायन, वादन स्पर्धांचे आयोजन केले आहे.

दिव्यांगांसाठी महान कार्य करणार्‍या हेलन केअर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. 1 जून रोजी रामभाई सामानी हॉल, उद्यमनगर येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. लोकराजा शाहूंच्या कलानगरीचा नावलौकिक जगभर आहे. त्यात अंध, दिव्यांग कलाकार बांधवांचाही वाटा मोठा आहे. यामध्ये अंध गायक, वादक कलाकारांची मोठी संख्या आहे. त्यांचा कलेत हातखंडा असून सर्वत्र संगीतमय गारूड आहे. याचीच अनुभूती या कार्यक्रमातून येणार आहे.
स्पर्धेत सहभागासाठी नॅब संस्था, शाहूपुरी 4 थी गल्ली, फोन – 0231-2656623 यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top button