महाराष्ट्रात सापडला ‘ज्ञानवापी’चा ऐतिहासिक पुरावा | पुढारी

महाराष्ट्रात सापडला ‘ज्ञानवापी’चा ऐतिहासिक पुरावा

कोल्हापूर : पुढारी डेस्क : ‘ज्ञानवापी’तील शिवलिंगाबाबतचा अद्ययावत ऐतिहासिक पुरावा महाराष्ट्रात आढळून आला आहे. ज्ञानवापी कुपातील स्नानानंतर यात्रेकरू भाविक आदिविश्वेश्वराची पूजा करत असत, असे यातून समोर आले आहे. दत्त संप्रदायातील संन्याशी गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्र’ या ग्रंथातून ‘ज्ञानवापी’चा तसा उल्लेख आलेला आहे. ‘गुरुचरित्र’ या आपल्या ग्रंथातून गंगाधर सरस्वती यांनी त्यांचे गुरू नरसिंह सरस्वती यांच्या काशी यात्रेचे वर्णन केले आहे.

गुरुचरित्रातील 42 व्या अध्यायातील 57 व्या श्लोकात ते म्हणतात…

महेश्वराते पुजोनि ।
ज्ञानवापी करी स्नान ।
नंदिकेश्वर अर्चोनि ।
तारकेश्वर पुजोनि ।
पुढें जावें मग तुवां ॥57॥

गंगाधर सरस्वतींच्या माहितीप्रमाणे, सोळाव्या शतकात काशीला दाखल होणारे यात्रेकरू आधी ज्ञानवापीत येऊन स्थान-ध्यान करत असत. नंतर ते नंदीची पूजा करून भगवान आदिविश्वेश्वराचे दर्शन घेत. अन्यत्रही यात्रेकरूंचा हाच क्रम लिखित व मौखिक स्वरूपातून सांगण्यात आलेला आहे. याआधारे मंदिराचा विध्वंस करण्यापूर्वीपासून याच क्रमाने ही प्रक्रिया चालत आलेली होती. गुरुचरित्रातील या वर्णनाच्या आधारे ज्ञानवापी परिसरात आढळलेली प्रतिमा ही फवारा नाही, असा दावा अनेक इतिहास तज्ज्ञांकडून केला जात आहे.
गोलाकार शिळा नेमकी काय?

ज्ञानवापी परिसरातील सर्वेक्षणात आढळलेल्या गोलाकार शिळेवरून हिंदू-मुस्लिम पक्ष समोरासमोर आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून संरक्षित करण्यात आलेल्या या शिळेला हिंदू पक्ष शिवलिंग म्हणत आहे, तर मुस्लिम पक्ष फवारा म्हणतो आहे. फवार्‍यात असते त्याप्रमाणे छिद्र या शिळेत नाही. पाणी उडविण्यासाठी म्हणून पाईप घुसविण्याची जागाही कुठे आढळलेली नाही. फवार्‍याचा आभास व्हावा म्हणून 2.5 फूट उंच गोलाकार शिवलिंगसद़ृश आकृतीवर वेगळा पांढरा दगड लावण्यात आला आहे. त्यावर कापल्यासारख्या खुणा केल्या आहेत, असे मुस्लिम पक्षाचा प्रतिदावा खोडून काढताना हिंदू पक्षाने म्हटले आहे.

शिव पुराण, लिंग पुराण, स्कंद पुराणातील काशी खंडात विश्वनाथ मंदिराचे वर्णन आले आहे. ‘ज्ञानवापी’ हा या मंदिराचाच एक भाग आहे. पुराणांव्यतिरिक्त ज्ञानवापीशी संबंधित सर्वश्रेष्ठ, सर्वात मजबूत आणि ऐतिहासिक द़ृष्टीने सर्वात अद्ययावत पुरावा महाराष्ट्रातील संन्याशी गंगाधर सरस्वती यांच्या ‘गुरुचरित्र’ या सोळाव्या शतकातील मराठी ग्रंथात नमूद आहे.
– ललित मिश्रा,
इतिहास तज्ज्ञ, नवी दिल्ली

Back to top button