कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखाना निवडणुकीसाठी १९१ उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखाना निवडणुकीसाठी १९१ उमेदवारी अर्ज दाखल

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ११३ तर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ६८ निवडणूक अर्ज दाखल झाले. त्यानंतर आज सोमवारी (दि.३०) १९१ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत विविध गटात ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत ११७४ अर्जांची विक्री झाली आहे.

दरम्यान, आज (दि.३०)  काँग्रेसच्या वतीने सासने मैदानावर एकत्र येत वाजत-गाजत शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेषतः करवीर, राधानगरी व भुदरगडमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले. आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनीही अर्ज दाखल केले. आजपर्यंत राखीव महिला गटात ७४ महिला उमेदवारांनी दुबारसह तब्बल ८५ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महिला गटात चुरस वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयाला कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख यांनी आजची गर्दीची शक्यता धरून अर्ज स्विकारण्यासाठी तयारी केली होती. बुधवारी (दि.१) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

तालुकावार कार्यक्षेत्राचे उत्पादक सात गट आहेत. तर राखीव पाच मतदार संघ आहेत.

गटवार उमेदवारी दाखल अर्ज असे : कार्यक्षेत्र तालुका, गट क्रमांक, एकूण उमेदवार संख्या व (कंसात दुबारसह अर्ज संख्या)
राधानगरी : गट क्र. १ : २५ (३४),
राधानगरी : गट क्र. २ : ३२ (३८),
कागल : गट क्र. ३ : २९ (३७),
कागल गट क्र. ४ : १३ ( १९ ),
भुदरगड : गट क्र. ५ : २८ (३५),
भुदरगड गट क्र. ६ : २६ ( ३२),
करवीर : गट क्र. ७ : १६ (१९) दुबार

राखीव जागा गट :

 महिला राखीव मतदार संघ : ७४ (८५),
इतर मागास मतदार संघ : ४१ (४५),
अनुसुचित जाती-जमाती मतदार संघ : १४ (१६),
भटक्या विमुक्त मतदार संघ : ९ (१२).
असे गटवार अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news