कोल्हापूर : निम्म्याहून अधिक शहराला आजपासून अपुरे पाणी | पुढारी

कोल्हापूर : निम्म्याहून अधिक शहराला आजपासून अपुरे पाणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : निम्म्याहून अधिक कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ मंगळवारपासून (दि. 17) काढण्यात येणार आहे. तीन दिवस हे काम चालणार असल्याने गुरुवारपर्यंत ए, बी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे तसेच ग्रामीण भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

फुलेवाडी रिंगरोड, जीवबा नाना जाधव पार्क, हरिप्रियानगर, सानेगुरुजी वसाहत, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेला परिसर, कात्यायनी, योगेश्वरी कॉलनी, शिवाजी पेठ, मिरजकर तिकटी, वारे वसाहत, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, रामानंदनगर,टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, कळंबा उंच टाकीवरून अवलंबून असणारा परिसर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडा पार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय. पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी, ई वॉर्ड व राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम—ाटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारी पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, महाडिक वसाहत आदी भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

Back to top button