कोल्हापूर : ‘राधानगरी’त 19, तर ‘दूधगंगा’त 10 टक्के साठा

file photo
file photo

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणात 19.82 टक्के, तर दूधगंगा धरणात 10.93 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांचा पाणीसाठा 24.42 टक्के इतका आहे. या आठ धरणांत मिळून एकूण 14 टीएमसी पाणी सध्या शिल्लक आहे.

राधानगरी धरणात सध्या 1.58 टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी राधानगरी धरणात 1.60 टीएमसी पाणी होते. सध्याचा पाणीसाठा कमी असला तरी जूनअखेर तो पुरेल इतका आहे; मात्र पाऊस लांबला तर पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दूधगंगा धरणात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जादा पाणीसाठा आहे; मात्र गतवर्षी धरणात पाण्याचा साठा कमी करण्यात आला होता. या वर्षी तो अधिक करण्यात आल्याने धरणात सध्या 2.62 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. याच कालावधीत गतवर्षी धरणात 1.50 टीएमसी पाणीसाठा होता.

वारणा धरणात गतवर्षीच्या तुलनेत अवघा 55.97 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी वारणा धरणात आजच्याच दिवसापर्यंत 7.36 टीएमसी पाणी होते. या वर्षी मात्र धरणात 4.12 टीएमसी पाणी आहे. पाटगाव, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी या मध्यम प्रकल्पांत मात्र गतवर्षीच्या तुलनेत किंचित जादा पाणीसाठा आहे.

मान्सूनपूर्व पावसाचा हातभार

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला होत आहे. या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा हातभार मिळाला आहे. या पावसाने सिंचनासाठी लागणार्‍या पाण्याची मागणी काहीशी कमी झाली आहे; अन्यथा धरणांतील पाण्याच्या मागणीत आणखी वाढ झाली असती. तुलनेने ती कमी झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news